
India Sqaud For Womens ODI World Cup 2025: मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिका व महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. अनुभवी सलामीवीर शेफाली वर्मा व अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांना संघात जागा मिळाली नाही.
India Squad For Womens ODI World Cup 2025
मुंबई येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीला बीसीसीआय सचिव देवजित सायकिया, निवड समिती सदस्य, मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार, कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना हे उपस्थित होते. जवळपास तासाभराच्या चर्चेनंतर संघ निश्चित करण्यात आला.
हरमनप्रीत व स्मृती यांच्यासह अनुभवी दीप्ती शर्म, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रेणूका ठाकूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव व स्नेह राणा या संघातील आपली जागा कायम राखण्यात यशस्वी ठरल्या. रिचा घोष व यास्तिका भाटिया या यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडतील. युवा प्रतिका रावल, श्री चरणी, क्रांती गौड व अमनजोत कौर प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. भारतातील विविध शहरांमध्ये 30 सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळली जाईल.
खराब फॉर्ममध्ये असलेली सलामीवीर शेफाली वर्मा व अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांना संघात जागा बनवण्यात अपयश आले. अनुजा पाटील, तेजल हसबनीस व श्रेयंका पाटील या खेळाडू देखील विश्वचषक संघाचा भाग नसतील. विश्वचषकापूर्वी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात एक बदल दिसेल. अमनजोत कौर हिच्या जागी या मालिकेत मुंबईची सायली सातघरे खेळताना दिसेल.
वनडे विश्वचषक 2025 साठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, प्रतिका रावल, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रिचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया व स्नेह राणा.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का