Breaking News

Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?

asia cup 2025

Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Asia Cup 2025 IND vs PAK Tickets Not Sold Out Yet

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई येथील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (Dubai International Cricket Stadium) येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्यासाठीची तिकिटे अद्याप पूर्णपणे विकली गेली नाहीत. सामन्याच्या दिवसापर्यंत सर्व तिकीटे विकले जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आयोजकांनी लागू केलेल्या ‘पॅकेज सिस्टीम’ मूळे चाहते सामन्याकडे पाठ फिरवण्याची चिन्हे दिसत आहेत.

पॅकेज सिस्टीम ठरते महत्त्वाचे कारण

एशिया कप 2025 मधील भारताच्या सामन्यांसाठी ‘पॅकेज सिस्टीम’ ने तिकीट विक्री सुरू आहे. ज्यामध्ये भारताच्या सर्व साखळी सामन्यांची तिकिटे घेणे बंधनकारक असेल. या पॅकेजचे दर जास्त असल्याने तिकीट विक्री अद्याप फारशी झालेली नाही. याआधी, एशिया कपसाठी एकावेळी एकाच सामन्याचे तिकीट विकत घेण्याचे प्रावधान होते. तसेच, या पॅकेजमध्ये सुपर सिक्स व नॉक आऊट सामने समाविष्ट नसल्याने, चाहत्यांमध्ये निरुत्साह असल्याचे दिसते.

 

ताणलेले भारत-पाकिस्तान संबंध 

सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे राजनैतिक संबंध ताणले आहेत. एप्रिल महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर पहेलगाम येथे हल्ला केला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केलेले. त्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध अत्याधिक बिघडले. त्यामुळे एशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धचे सामने खेळण्यासाठी भारतीय खेळाडू ऐनवेळी नकारही देऊ शकतात. याच कारणाने अनेकांनी तिकिट खरेदीसाठी सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

स्टार खेळाडूंची उणीव 

भारतीय टी20 संघात सध्या विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यासारखे खेळाडू समाविष्ट नाहीत. त्याचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याचे स्पष्टपणे दिसते. पाकिस्तान संघातही बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांचा समावेश केला गेलेला नाही.

(Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर