
Central Zone Won Duleep Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (15 सप्टेंबर) समाप्त झाला. मध्य विभागाने दक्षिण विभागाचा 6 गडी राखून पराभव करत ही स्पर्धा आपल्या नावे केली. मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी अवघ्या चार महिन्याच्या काळात दोन महत्त्वाचा स्पर्धा जिंकण्याची कामगिरी नोंदवली.
𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐚𝐥 𝐙𝐨𝐧𝐞 𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐞 𝐃𝐮𝐥𝐞𝐞𝐩 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲 𝐰𝐢𝐧𝐧𝐞𝐫𝐬! 🙌
Yash Rathod hits the winning runs and finishes it off in style as Central Zone beat South Zone by 6⃣ wickets👌
A fantastic victory 👏
Scorecard ▶️ https://t.co/unz0hJ66yE#DuleepTrophy | #Final… pic.twitter.com/dLcTLrCAz7
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2025
Central Zone Won Duleep Trophy 2025
सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी केवळ 65 धावांची आवश्यकता असताना मध्य विभागाने चार गडी गमावत हे आव्हान पार केले. पहिल्या डावात मध्य विभागासाठी 194 धावांची खेळी करणारा यश राठोड सामन्याचा मानकरी ठरला. तर, अष्टपैलू सारांश जैन याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
बेंगळुरू येथे झालेल्या या अंतिम सामन्यात सारांश जैन याच्या पाच व कुमार कार्तिकेय चार बळींच्या जोरावर मध्य विभागाने दक्षिण विभागाचा पहिला डाव केवळ 149 धावांवर संपवला होता. त्यानंतर यश राठोड व रजत पाटीदार यांच्या शतकांमुळे मध्य विभागाने 511 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 426 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मध्य विभागाला अखेरच्या दिवशी केवळ 65 धावा विजयासाठी हव्या होत्या. या धावा त्यांनी चार बळी गमावून पूर्ण केल्या.
मध्य विभागाचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार आपल्या नेतृत्वाने चार महिन्यात दोन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला. जून महिन्यात त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी, मध्य प्रदेश संघालाही रणजी विजेतेपद मिळवून देण्यात त्याला यश आलेले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: “Kapil Dev मोठा मॅच-फिक्सर”, दिग्गजाचे गंभीर आरोप, 90 च्या दशकातील घटना…
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।