
Dickie Bird Passes Away At 92: क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व महान पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या डिकी बर्ड यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. यॉर्कशायर काऊंटीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अचूक निर्णय व अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
The legendary former umpire Dickie Bird has died at the age of 92. pic.twitter.com/J2VItkFdkU
— Wisden (@WisdenCricket) September 23, 2025
Legendary Cricket Umpire Dickie Bird Passes Away At 92
सर्वच क्रिकेटपटू व चाहत्यांकडून आदर मिळवलेल्या बर्ड यांनी क्रिकेटपटू म्हणून यॉर्कशायरसह कारकीर्द सुरू केली होती. मात्र, दुखापतीमुळे त्यांना कारकीर्द अर्ध्यावर सोडावी लागली. त्यानंतर पंच म्हणून त्यांनी मोठे नाव कमावले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 66 कसोटी व 69 वनडे सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. 1973 ते 1996 यादरम्यान तीन विश्वचषक अंतिम सामन्यात त्यांना पंच म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. भारताने जिंकलेल्या 1983 वनडे विश्वचषक (1983 ODI World Cup) सामन्याच्या अंतिम सामन्यात देखील त्यांनी काम पाहिलेले.
डिकी बर्ड यांचे खरे नाव हेरॉल्ड डेनिस बर्ड असे होते. डोक्यावरील पांढरी हॅट, दुमडलेल्या बाह्या व मिश्किल बोलल्यामुळे त्यांना ओळखले जायचे. निर्णयातील अचूकता व खेळाडूंशी मित्रत्वाचे नाते यामुळे त्यांना नेहमी सन्मान मिळत राहिला. सौरव गांगुली व राहुल द्रविड यांनी कसोटी पदार्पण केलेल्या 1996 लॉर्ड्स कसोटीत त्यांनी अखेरच्या वेळी काम केलेले. या अंतिम सामन्यात त्यांना दोन्ही संघांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।