
Vaibhav Suryavanshi 32 Ball Century: एशिया कप रायझिंग स्टार्स या स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध युएई (INDAvUAE) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 32 चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने 42 चेंडूवर 144 धावा कुटल्या.
WHAT. A. KNOCK 🤯
Vaibhav Suryavanshi lights up India A's #RisingStarsAsiaCup opener with a magnificent 32-ball HUNDRED 👏🙌
Updates ▶️ https://t.co/c6VL60RuFV pic.twitter.com/iT0mvtOljo
— BCCI (@BCCI) November 14, 2025
Vaibhav Suryavanshi 32 Ball Century For India A
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशी व प्रियांश आर्या यांनी भारतासाठी सलामी दिली. बॉस बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 14 वर्षाच्या वैभवने सुरूवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने अवघ्या 17 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतरही धावांचा ओघ कायम राहिला. त्याने पुढील 15 चेंडूत शतकी मजल मारली. बाद होण्यापूर्वी त्याने 42 चेंडूवर 144 धावा फटकावल्या. यामध्ये 11 चौकार व 15 षटकारांचा समावेश होता.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी
kridacafe