Breaking News

ATP Ranking 2025: वर्षातील शेवटची टेनिस क्रमवारी जाहीर! या खेळाडूंनी राखले वर्चस्व

atp rankings 2025
Photo Courtesy: X

Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व‌ यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे. 

Final ATP Ranking 2025

संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही क्रमवारी घोषित केली गेली. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ याने या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले. तर, सिन्नर हा दुसऱ्या स्थानी राहिला. एटीपी टूर फायनल्स अंतिम सामन्यात कोणीही जिंकले तरी, अल्कारेझ हा आपले अव्वलस्थान कायम राखेल. अल्कारेझने या वर्षी 71 सामने जिंकले आहेत. फ्रेंच ओपन व अमेरिकन ओपन या ग्रॅंडस्लॅमचे विजेतेपद त्याने पटकावले. रोम ओपन, मॉंटे कार्लो ओपन, सिनसिनाटी ओपन व जापान ओपन त्याने आपल्या नावे केले होते.

या क्रमवारीत ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर, टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) चौथ्या क्रमांकावर वर्ष समाप्त करेल. कॅनडाचा युवा फेलिक्स ऑगेर-ऍलियासीम (Felix Auger-Aliassime) हा टॉप पाचमध्ये राहील. टेलर फ्रित्झ, ऍलेक्स डी मिनॉर, लॉरेन्झो मुसेट्टी, बेन शिल्टन व जॅक ड्रेपर हे अव्वल 10 मध्ये असतील.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Cheteshwar Pujara ने दाखवला टीम इंडियाला आरसा, म्हणाला, “अशी हार तुम्ही कशी…”