Breaking News

Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज

ashes 2025-2027
Photo Courtesy: X

Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल.

Ashes 2025-2026 Preview

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. सन 2023-2024 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी राहिली होती. मात्र, 2021 ची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने ऍशेस कुपी त्यांच्याकडेच राहिली. आता 15 वर्षांचा वनवास संपवत इंग्लंड ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ यासाठी ऑस्ट्रेलिया पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केल्यास पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हा उपलब्ध नसेल. तसेच, अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याची देखील संघाला उणीव भासेल. पहिल्या सामन्यासाठी स्टीव्ह स्मिथ याला ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे.

मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 नोव्हेंबर यादरम्यान पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर होईल. दुसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ऍडलेड ओव्हल येथे 17 ते 21 डिसेंबरपासून तिसरा सामना रंगेल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान ‘बॉक्सिंग डे’ कसोटी होईल. मालिकेतील अखेरचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 4 ते 8 जानेवारी या कालावधीत होणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ- स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, जॅक वेदराल्ड, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, ब्यु वेब्स्टर, मायकेल नेसर, ऍलेक्स केरी, जोश इंग्लिश, मिचेल स्टार्क, सीन एबॉट, स्कॉट बोलॅंड, ब्रेंडन डॉगेट व नॅथन लायन.

ऍशेस 2025-2026 साठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जेकब बेथल, विल जॅक्स, शोएब बशीर, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, ख्रिस वोक्स, मॅट पॉट्स, मार्क वूड, जोश टंग.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Cheteshwar Pujara ने दाखवला टीम इंडियाला आरसा, म्हणाला, “अशी हार तुम्ही कशी…”