Breaking News

स्टार्कवर भारी पडला स्टोक्स! Ashes 2025-2026 च्या पहिल्याच दिवशी ‘दर्जा’ क्रिकेटची मेजवानी

ashes 2025-2026
Photo Courtesy: X

Ashes 2025-2026 Perth Test Day 1: प्रतिष्ठित ऍशेस मालिकेच्या पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) हे चमकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 49 धावांनी पिछाडीवर आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी जवळपास 52 हजार चाहत्यांनी मैदानात हजेरी लावली.

Ashes 2025-2026 Perth Test Day 1

ऑप्टस स्टेडियम येथे सुरू झालेला पहिल्या कसोटीच्या पहिल्याच षटकात स्टार्कने झॅक क्राऊलीला बाद करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर इंग्लंडची गाडी रुळावर आली नाही. स्टार्कने नियमित अंतराने धक्के देत इंग्लंडचा डाव अडचणीत टाकला. उपकर्णधार हॅरी ब्रूक याने इंग्लंडसाठी एकमेव अर्धशतक झळकावले. स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना 58 धावा देत 7 बळी मिळवले. तर, पदार्पणात ब्रेंडन डॉगेट याने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात देखील अशीच खराब झाली. जोफ्रा आर्चरने दुसऱ्या चेंडूवर जॅक वेदराल्डला बाद केले. त्याने व ब्रायडन कार्सने आघाडीचे चार फलंदाज बाद केल्यावर कर्णधार बेन स्टोक्स याने अवघ्या सहा षटकांच्या स्पेलमध्ये पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 बाद 123 धावा केल्या होत्या. तर, इंग्लंडकडे 49 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: सुपरस्टार Mitchell Starc! ऍशेसच्या पहिल्या दिवशीच गाजवली इंग्लंडवर सत्ता