Asia Cup Rising Stars 2025 Semi Final: दोहा येथे सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेश अ संघाने भारतीय अ संघाला (INDAvBANA) सुपर ओव्हरमध्ये मात दिली. भारतीय संघ सुपर ओव्हरमध्ये एकही धाव बनवू शकला नाही.
Bangladesh A Beat India A In Asia Cup Rising Stars 2025 Semi Final
दोहा येथे झालेल्या या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा सलामीवीर हबीबुर सोहनने 65 धावांची खेळी केली. मेहरोब याने केवळ 18 चेंडूवर नाबाद 48 धावा करत बांगलादेशची धावसंख्या 194 पर्यंत पोहोचवली. भारतासाठी गुर्जपनीत सिंग याने दोन बळी मिळवले.
विजयासाठी 195 धावांची आवश्यकता असताना वैभव सूर्यवंशी याने पहिल्याच षटकात 19 धावा चोपल्या. तो 15 चेंडूत 38 धावा काढून बाद झाला. तर, दुसरा सलामीवीर प्रियांश आर्या याने 23 चेंडूवर 44 धावा बनवल्या. यानंतर मात्र भारतीय फलंदाजांना धावांचा ओघ राखता आला नाही. नमन धीर 7 (12), जितेश शर्मा 33 (23) व नेहल वढेरा 32 नाबाद (29) यांना मोठे फटके खेळण्यात अपयश आले. अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना आशुतोष शर्माने तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर षटकार आणि चौकार खेचत सामना 2 चेंडू 4 धावा असा आणला. मात्र, आशुतोष पाचव्या चेंडूवर बाद झाला. अखेरच्या चेंडूवर हर्ष दुबे याने तीन धावा करत सामना टाय केला.
सुपर ओव्हरमध्ये भारतासाठी जितेश शर्मा व रमनदीप फलंदाजीसाठी आले. मात्र, जितेश पहिल्या व आशुतोष दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्याने भारताचा संघ सर्वबाद झाला. विजयासाठी एक धाव हवी असताना बांगलादेशचाही पहिल्या चेंडूवर बळी गेला. मात्र, पुढील चेंडू वाईड गेल्याने बांगलादेशने अंतिम सामन्यात धडक दिली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान शाहीन्स व श्रीलंका अ भिडतील.
Latest Sports News In Marathi
kridacafe