
Urvil Patel Hits 31 Ball Century In SMAT 2025: बुधवारी (26 नोव्हेंबर) सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेची भारतातील विविध शहरांमध्ये सुरुवात झाली. गुजरात विरुद्ध सेनादल या एलिट गट सामन्यात गुजरातचा कर्णधार उर्विल पटेल याने वादळ आणले. 183 धावांचा पाठलाग करताना त्याने केवळ 31 चेंडूंमध्ये शतक झळकावले. टी20 क्रिकेटमधील हे भारतीयाकडून आलेले तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले. विशेष म्हणजे या यादीत 28 चेंडूतील शतकासह तोच प्रथम क्रमांकावर आहे.
Urvil Patel Hits 31 Ball Century In SMAT 2025
हैदराबाद येथील जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात सेनादल संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर गौरव कोचर याने शानदार 60 धावा बनवत संघाला 182 पर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात संघाला कर्णधार उर्विल पटेल व आर्या देसाई यांनी केवळ 11.4 षटकात 174 धावांची सलामी दिली. आर्या 35 चेंडूत 60 धावांची खेळी करून माघारी परतला. यादरम्यान उर्विल याने विरोधी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 31 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 37 चेंडूवर 119 धावा केल्या. यामध्ये 12 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता. गुजरातने केवळ 12.3 षटकात 2 गडी गमावून विजयी लक्ष पूर्ण केले.
उर्विल याने मागील वर्षी त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावले होते. त्यासोबतच अभिषेक शर्मा याने देखील 28 चेंडूंमध्ये टी20 शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघात उर्विल याला एमएस धोनी याचा उत्तराधिकारी मानले जाते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: INDvSA: दक्षिण आफ्रिकेने दिला भारताला व्हाईट वॉश! 408 धावांनी स्विकारला इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।