Breaking News

IPL 2024 Qualifier 1 Preview| कोणाचे पारडे जड? KKR की SRH कोण गाठणार मेगा फायनल?

IPL 2024 Qualifier 1 Preview|आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्सचे चित्र स्पष्ट झालेले असून, मंगळवारपासून (21 मे) प्ले ऑफ्स लढतींना सुरुवात होईल. यामध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद भिडतील. या सामन्यात विजेता ठरणारा संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल.

स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आठ विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्सने पहिले स्थान पटकावलेले. तर सरस धावगतीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला मागे टाकत दुसरे स्थान जिंकले. यामुळे या दोन्ही संघांना अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या प्रत्येकी दोन संधी मिळणार आहेत.

हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. मंगळवारी अहमदाबाद शहरातील हवामान हे कोरडे राहणार असल्याने या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता अगदीच कमी आहे. दोन्ही संघांचा विचार केल्यास तसेच अहमदाबाद येथील खेळपट्टीचा अंदाज पाहिल्यास येथे मोठ्या धावसंख्येचा सामना होऊ शकतो. दोन्ही संघात आक्रमक फलंदाज असल्याने प्रेक्षकांना थरारक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

केकेआर संघ मागील 11 दिवसांपासून एकही सामना खेळलेला नाही. त्यांचे दोन सामने पावसामुळे धुवून गेले आहेत. कशात विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सोबतच या हंगामात छाप पाडलेला इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट हा देखील माघारी परतल्याने सलामीला रहमानुल्लाह गुरबाज याला संधी मिळू शकते. अष्टपैलू सुनील नरीन व आंद्रे रसेल यांच्यावर पुन्हा एकदा संघाची भिस्त आहे. स्टार्क, राणा व चक्रवर्ती हे संघाची गोलंदाजी मजबूत बनवतात.

दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबाद तुफान फॉर्ममध्ये दिसून येतोय. ट्रेविस हेड व अभिषेक शर्मा या सलामी जोडीने आक्रमक खेळाचा नमुना सादर केला आहे. मधल्या फळीत क्लासेन, अब्दुल समद व नितीश रेड्डी संघाला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत. तर गोलंदाजीत स्वतः कर्णधार पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार व नटराजन संघाच्या विजयात हातभार लावताना दिसत आहेत.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

कोलकाता नाईट रायडर्स- सुनील नरीन, रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, हर्षित राणा व वरूण चक्रवर्ती‌. इम्पॅक्ट प्लेयर- वैभव अरोडा.

सनरायझर्स हैदराबाद- ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन, नितीश रेड्डी, सनवीर सिंग, शाहबाझ अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडेय.‌ इम्पॅक्ट प्लेयर- जयदेव उनाडकत.

(IPL 2024 Qualifier 1 Preview‌: KKR & SRH Fight For Final Spot)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *