Breaking News

आयपीएल 2025 मध्ये Ajinkya Rahane ची धमाकेदार सुरूवात! पाहा नेत्रदीपक षटकारांचा व्हिडिओ

ajinkya rahane
Photo Courtesy: X

Ajinkya Rahane Fiery Start In IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKRvRCB) आमने सामने आले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या केकेआरने 174 धावा उभ्या केल्या. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आक्रमक अर्धशतक झळकावले.

Ajinkya Rahane Fiery Start In IPL 2025

घरच्या मैदानावर खेळत असलेल्या केकेआर संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. मात्र, डी कॉक पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर रहाणे मैदानावर उतरला. जोश हेजलवूड याची दोन षटके संपल्यानंतर युवा रसिक सलाम याच्यावर हल्ला चढवत दोन षटकार व एक चौकार वसूल केला. त्यानंतरही त्याने आपले आक्रमक धोरण असेच कायम ठेवले. सुयश शर्मा या चेंडूवर षटकार मारत त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात खेळताना केकेआरसाठी अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला 25 चेंडू लागले. कृणाल पंड्या याच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 31 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या. यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

अजिंक्य रहाणे याला आयपीएल 2025 लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने निवडले नव्हते. मात्र, दुसऱ्या फेरी केकेआरने त्याला दीड कोटीच्या बेस प्राईसवर आपल्या संघात समाविष्ट केले. रहाणे त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत स्पर्धेचा मानकरी राहिलेला. केकेआर संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला या हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले.

हे देखील वाचा- IPL 2025 च्या ‘यंगगन्स’! ज्या यावर्षी नक्कीच धडाडणार, भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणार

बॉलिवूडच्या तडक्याने IPL 2025 ची ग्रॅंड ओपनिंग! ईडन गार्डनवर रंगला झगमगाता सोहळा