
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या एलिमिनेटर सामनात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला चार गडी राखून पराभूत केले. यासह राजस्थानने क्वालिफायर दोनमध्ये आपली जागा पक्की केली. तर, दुसऱ्या बाजूला आरसीबीला घरचा रस्ता पकडावा लागला. या पराभवानंतर आरसीबी संघाचे खेळाडू व चाहते प्रचंड निराशा आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक अंबाती रायुडू याने आरसीबी संघाला सुनावले आहे.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबी संघाची कामगिरी पहिल्या आठ सामन्यात चांगली राहिली नव्हती. त्यांना तब्बल सात पराभव यामध्ये पाहायला मिळाले होते. त्यानंतर पुढील सहा सामने जिंकत त्यांनी प्ले ऑफ्समध्ये जागा बनवली. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी सीएसकेला हरवले होते. या विजयानंतर संघाने व चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केलेला.
एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर सीएसकेचा माजी खेळाडू असलेल्या रायुडू याने प्रतिक्रिया देताना म्हटले,
“जेव्हा तुम्ही आरसीबी संघाकडे पाहता तेव्हा तुम्हाला कळते की फक्त झोकून देऊन आणि आक्रमक सेलिब्रेशन केल्यावर तुम्हाला आयपीएल ट्रॉफी जिंकता येत नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त प्ले ऑफ्समध्ये जाणे गरजेचे नसते. असा विचार करू नये की, सीएसकेला (CSK) ला हरवून तुम्हाला ट्रॉफी जिंकता येईल.”
रायुडू हा 2018 ते 2023 या काळात चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. त्याने संघासाठी दरवेळी योगदान दिले होते. या काळात चेन्नईने तब्बल तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकत स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ होण्याचा मान मिळवला. अखेरच्या साखळी सामन्यात सीएसके पराभूत झाल्यानंतर वरूण ऍरॉन व रायुडू यांच्यात मजेदार नोकझोक झाली होती.
(Ambati Rayudu Slams RCB With Taking Name Of CSK)
Good post! We will be linking to this particularly great post on our site. Keep up the great writing