
Ankush Rathee Left Bengaluru Bulls Squad In PKL 12: प्रो कबड्डी लीग 2025 सुरू होऊन अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी उलटला नाही. स्पर्धेतील पहिला लेग संपल्यानंतर स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागत, बेंगळुरू बुल्स व त्यांचा हंगामाच्या सुरुवातीचा कर्णधार अंकुश राठी वेगळे झाले आहेत.
Ankush Rathee Left Bengaluru Bulls Squad In PKL 12
पीकेएल 12 च्या लिलावात बुल्सने अंकुश याला तीस लाख रुपयांच्या किमतीसह संघात सामील केले होते. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिलेली. बेंगळुरू संघाला आपल्या पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर अंकुश व संघ व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद झाल्याचे समजते. तिसऱ्या सामन्यापूर्वी बचावपटू योगेश दहिया याला कर्णधारपद देत अंकुशला बाकावर बसवण्यात आले होते. त्याचवेळी अंकुश व बुल्स यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून एकमेकांना अनफॉलो केले. तसेच, सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक बीसी रमेश यांना याबाबत विचारले असता त्यांनी, “कोणी फॉलो आणि फॉलो केले यांनी काही फरक नाही पडत. संघाचे वातावरण चांगले आहे आणि आम्ही पुढे पाहत आहोत.” असे उत्तर दिलेले. मात्र, अखेर या सर्व गोष्टींवर पडदा पडत अंकुश राठी याने बेंगळुरू बुल्स कॅम्प सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना झाल्याचे दिसते.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।