Breaking News

Euro 2024: फ्रान्सचा पाडाव करत ‘अजिंक्य’ स्पेन फायनलमध्ये! 16 वर्षीय यमालने रचला इतिहास

EURO 2024
Photo Courtesy: X/EURO 2024

Euro 2024: युरो कप 2024 चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 जुलै) मध्यरात्री खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या स्पेन व फ्रान्स (SPA vs FRA) यांच्यातील या सामन्यात स्पेनने सरशी साधली. पहिल्या 25 मिनिटांमध्येच झालेल्या तीनही गोलनंतर स्पेनने 2-1 असा विजय संपादन केला. यासह त्यांनी बारा वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला.

विजेतेपदाचे दावेदार म्हणून मैदानात उतरलेल्या या दोन्ही संघातील खेळाची सुरुवात आक्रमक झाली. स्पर्धेत आत्तापर्यंत मैदानी गोल करण्यात अपयशी ठरलेल्या फ्रान्सने आठव्याच मिनिटाला खाते उघडले. कोलो मुआनी याने हेडरद्वारे गोल करत आपल्या संघाला आघाडीवर नेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

त्यानंतर स्पेनने बरोबरी करण्यासाठी केवळ तेरा मिनिटे घेतली. 21 व्या मिनिटाला लमिन यमाल (Lamine Yamal) याने एकट्याने फ्रान्सच्या बचाव फळीला भेदत बॉक्स बाहेरून एक शानदार गोल केला. यासह तो युरो स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. लमिन सध्या 16 वर्ष 362 दिवस इतकी आहे. यानंतर चारच मिनिटांनी म्हणजे 25 व्या मिनिटाला डॅनी ओल्मो (Dani Olmo) याने आणखी एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पूर्ण वेळेत एकही गोल झाला नाही व स्पेन संघाने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.

(Euro 2024 Spain Reach Final Best France)