
Former Indian Cricketer Take Dig On Rohit Virat: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 43 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने या सामन्यात वेगवान सुरुवात करून दिलेली. सामना संपल्यानंतर त्याचे कौतुक करताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याने रोहित शर्मा व विराट कोहली (Rohit Virat) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर या सामन्यातून यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल ही नवी सलामी जोडी भारतीय संघाला मिळाली. यशस्वी याने या संधीचा फायदा घेत केवळ 21 चेंडूंमध्ये 40 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला 213 धावा उभ्या करण्यास मदत झाली.
सामना संपल्यानंतर समीक्षक म्हणून कामगिरी करत असलेल्या आशिष नेहरा याने जयस्वाल याच्याशी संवाद साधला. त्याचे कौतुक करताना तो म्हणाला,
“तुला आत्ता अजय जडेजा यांनी विचारले की, काय फरक असतो जेव्हा रोहित शर्मा व विराट कोहली तिथे असतात? त्यावर मी म्हणेल की, खरंच इतकाच असतो जेव्हा ते दोघे असतात तेव्हा तुला हे फटके नेट्समध्ये खेळावे लागले असते.”
त्याच्या या वक्तव्यामुळे सर्वांना हसू आले. रोहित व विराट यांनी 2024 टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. ते दोघे आता केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील.
(Ashish Nehra Take Dig On Rohit Virat)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।