Breaking News

आजपासून Asia Cup 2025 चे ‘रन’युद्ध! भारत दावेदार मात्र वाट खडतर

asia cup 2025
Photo Courtesy: X

Asia Cup 2025 Starts Tonight: आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कप स्पर्धेला मंगळवारी ‌(9 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग (AFG vs HK) या सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल. एकूण आठ संघांच्या या स्पर्धेत गतविजेता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याचवेळी इतर संघांपासून देखील भारताला सावध रहावे लागेल.

Asia Cup 2025 Starts Tonight

पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेमुळे यावेळी आशिया कप हा टी20 स्वरूपात खेळला जाईल. मागील वेळी वनडे स्वरूपात झालेल्या या स्पर्धेत भारताने विजय मिळवलेला. अ गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश व हॉंगकॉंग हे संघ सामील आहेत. तर, ब गटात भारत, पाकिस्तान, ओमान व यजमान युएई असतील. प्रत्येक गटात अव्वल दोन राहणाऱ्या संघांना सुपर फोर फेरीत खेळण्याची संधी मिळेल. या फेरीत प्रत्येक‌ संघ विरोधी संघाविरुद्ध एक सामना खेळेल. अव्वल दोन संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. स्पर्धेतील सर्व सामने दुबई व अबुधाबी येथे होणार आहेत. स्पर्धेतच अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळला जाईल.

प्रथमच अनुभवी खेळाडूंच्या विना भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी मैदानात उतरेल. जून महिन्यात समाप्त झालेल्या आयपीएलनंतर भारतीय खेळाडू प्रथमच मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळतील. दुसरीकडे नुकतीच पाकिस्तानने तिरंगी मालिका जिंकत विजेचेपदासाठी दावा ठोकला आहे. या व्यतिरिक्त अफगाणिस्तान व श्रीलंका पुन्हा एकदा अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतील.

या स्पर्धेत भारताची मदार प्रामुख्याने कर्णधार सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या अनुभवी खेळाडूंवर असेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी देखील या स्पर्धेचे महत्त्व मोठे असणार आहे.

(Latest Sports News In Marathi)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?