Breaking News

“वर्ल्डकप जिंकून आमचा साधा सत्कारही नाही”, बॅडमिंटनपटू Chirag Shetty ने बोलून दाखवली खदखद, क्रिकेटपटूंच्या…

chirag shetty
Photo Courtesy: X

Chirag Shetty: सध्या सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक विजयाचा जल्लोष सुरू आहे. जगभरातून संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच ठीकठिकाणी खेळाडूंना सन्मानित देखील केले जातेय. मात्र, असे असतानाच भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी (Chirag Shetty) याने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाच्या या यशाबद्दल 125 कोटी रुपयांचे बक्षीस बीसीसीआयने खेळाडू व सपोर्ट स्टाफला दिले. याव्यतिरिक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खेळाडूंची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारने या विश्वचषक संघात खेळणारे महाराष्ट्राचे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे व यशस्वी जयस्वाल यांना तब्बल 11 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी देखील या खेळाडूंना निमंत्रित केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सर्व प्रकरणावर बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याने एका मुलाखतीत बोलताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तो म्हणाला,

“माझा क्रिकेटला विरोध नाही. एक भारतीय म्हणून आम्ही देखील तो विजय साजरा केला. मी देखील बॅडमिंटनमधील विश्वचषक म्हटला जाणारा थॉमस कप जिंकला होता. राज्य सरकारने या विश्वविजेत्या खेळाडूंचा सन्मान केला हे चांगलेच आहे. मात्र, आमच्या कष्टाकडे देखील त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. मोठी बक्षीस रक्कम नाही दिली तरी चालेल मात्र आमचा सन्मानही केला गेला नाही.”

भारतीय बॅडमिंटन संघाने बॅडमिंटन मधील विश्वचषक म्हटला जाणारा थॉमस कप 2022 मध्ये उंचावला चिराग या संघाचा भाग राहीलेला. चिराग हा मुंबईचा असून तो, सात्विक साईराज याच्या सह जगातील अव्वल दुहेरी खेळाडूंपैकी एक आहे. आगामी पॅरिस ऑलम्पिकमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

(Badminton Player Chirag Shetty Speaks On Cricketers Felicitation)