
BCCI Meeting In Mumbai: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-2025 (BGT 2024-2025) मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीची मिमांसा या बैठकीत केली जाईल. या बैठकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना बोलावले गेले आहे.
BCCI Meeting In Mumbai
Rohit Sharma, Gautam Gambhir and Ajit Agarkar will be attending the BGT Review meeting today.
– Questions will be asked on India's defeats. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/MksR3hk1mc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 11, 2025
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 असे पराभूत व्हावे लागले. यासोबतच भारतीय संघात उघड मतभेद असल्याचे वृत्त येत होते. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानै चालू दौऱ्यात निवृत्तीची घोषणा केली. तर, रोहित शर्मा याने अखेरच्या कसोटीतून माघार घेतली होती. तसेच, काही युवा खेळाडू कर्णधारपद भूषवण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील बोलले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
या बैठकीत बीसीसीआयचे काही वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होतील. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी व भारतीय कसोटी संघाचे भवितव्य या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. कसोटी संघातील वरिष्ठ खेळाडूंची स्थान हा मुद्दा कळीचा ठरू शकतो. या सर्वांमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मत महत्त्वाचे ठरेल. कारण, गंभीर हे 2027 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. त्यामुळे ते ज्या प्रकारचा संघ सुचवतील, त्यावर बीसीसीआय व निवड समितीला निर्णय घ्यावा लागेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितसह अनुभवी विराट कोहली व रवींद्र जडेजा यांची कामगिरी फारसे चांगली राहिली नव्हती. भारतीय संघ आगामी कसोटी सामना जुलै महिन्यात खेळेल. तोपर्यंत हे खेळाडू 37 पेक्षा जास्त वयाचे असतील. त्यामुळे त्यांच्या भवितव्याविषयी निर्णय होईल.
(BCCI Meeting In Mumbai)
हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?
पाहा BGT 2024-2025 मधील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास