
CAT On Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) विजयानंतर बंगळुरूमध्ये निघालेल्या विजयी मिरवणुकीतील चेंगराचेंगरीबद्दल सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायबुनल म्हणजेच कॅट (CAT) ने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तब्बल 11 जणांचा मृत्यू झालेला या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी व्यवस्थापन (RCB Management) जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
CAT On Chinnaswamy Stadium Stampede
पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर केलेल्या विजयोत्सवामुळे झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनालाच मुख्यत्वे जबाबदार धरण्यात आले आहे. 4 जून रोजी या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला. कॅटने म्हटले आहे की, बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी व्यवस्थापन प्रथमदर्शनी आरोपी असल्याचे दिसून येते. शिवाय, लवादाने स्पष्टपणे म्हटले आहे की, कमी वेळात अचानक सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी पोलिसांकडे अलाद्दीनचा जादूचा दिवा नव्हता. (Latest Cricket News)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: डॉक्टर्स डे स्पेशल: कोण आहेत Dr Dinshaw Pardiwala ? ज्यांच्यावर आहे प्रत्येक भारतीय खेळाडूचा 100% विश्वास
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।