Breaking News

Singapore Badminton Open 2025 च्या एकेरीतून भारताचे आव्हान संपुष्टात, आता एकाच पदकाची आशा

Singapore badminton open 2025
Photo Courtesy: x

Singapore Badminton Open 2025: सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2025 स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतून भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) व‌ पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता भारताचे आव्हान केवळ पुरुष दुहेरीत असून, सात्विक साईराज व चिराग शेट्टी (SatwikSairaj & Chirag Shetty) यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

Singapore Badminton Open 2025

दुसऱ्या फेरीत सिंधूला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या चेन युफेई हिच्याकडून 21-9, 18-21,21-16 असे पराभूत व्हावे लागले. ही लढत जवळपास एक तास पाच मिनिटे चालली. चेनने सिंधूला आतापर्यंत 13 सामन्यात सात वेळा पराभूत केले आहे. दुसरीकडे भारताचा 34 वा मानांकित प्रणॉय फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोवविरूद्ध 21-16,21-18 असा पराभूत झाला.

जवळपास दोन महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने विजय संपादन केला. मात्र, दुहेरीत जॉली ट्रेसा व गायत्री गोपीचंद पराभूत झाल्या. मिश्र दुहेरीत रोहन कपूर व ऋत्विका गड्डे यांना दुसऱ्या फेरीतून बाहेर पडावे लागले.

Singapore Badminton Open 2025

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Avinash Sable ने 36 वर्षांचा वनवास संपवला! भारताच्या खात्यात एशियन ऍथलेटिक्सचे सुवर्ण

इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती