Breaking News

Indian Football मध्ये गदारोळ! अंतर्गत राजकारणाने घेतला प्रमुख स्पर्धांचा बळी, खेळाडूंचे भवितव्य अंधारात

INDIAN FOOTBALLChaos In Indian Football: जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ असलेल्या फुटबॉलचे भारतातील (Indian Football) भविष्य चांगलेच अंधारात सापडले आहे. अंतर्गत राजकारणाने अनेक मुख्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आले असून, काही स्पर्धा रद्द देखील करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा खेळाडूंच्या भवितव्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

भारतातील दुसरी महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय लीगचा (I League 2024-2025) नवा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप स्पर्धेचे प्रसारण करण्यासाठी अपेक्षित प्रायोजक न मिळाल्याने ही स्पर्धा आता दिवाळीनंतर होऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी, खेळाडू व संघ याबाबत आशावादी आहेत. याव्यतिरिक्त आय लीग 2 आणि आय लीग 3 या स्पर्धेतील सुरू झालेल्या नाहीत.

दुसरीकडे, महिला फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा इंडियन वुमन्स लीग (IWL) कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच, सुपर कप यावर्षी रद्द करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचा महान फुटबॉलपटू बायचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) याने एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे (AIFF President Kalyan Chaubey) यांच्यावर ते महासंघाची पत कमी करत असल्याचा आरोप केला होता. याव्यतिरिक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या प्रमुख पी टी उषा यांनी देखील चौबे यांच्यावर ऑलम्पिक महासंघाचे कार्यकारी अधिकारी म्हणून, स्वतःला सादर केल्याचा आरोप केला होता.

भारताच्या मेडल्सच्या अपेक्षांना हादरा! Glasgow Commonwealth 2026 मधून‌ ‘हे’ 9 खेळ बाहेर

सध्या भारतात केवळ इंडियन सुपर लीग (Indian Super League) ही एकच फुटबॉल स्पर्धा खेळली जात असून, यामध्ये देखील संघमालक आर्थिक नुकसान सोसत असल्याचे बोलले जाते. तसेच, आगामी हंगामात रेलिगेशन नियमाच्या विरोधात देखील काही संघ असल्याचे सांगितले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(Complete Chaos In Indian Football)