
Cristiano Ronaldo On Retirement: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या नेतृत्वात पोर्तुगाल संघाने नुकतीच युएफा नेशन्स लीग 2025 UEFA Nations League 2025) ही मानाची स्पर्धा जिंकली. त्यानंतर आता रोनाल्डो याने त्याच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Cristiano Ronaldo On His Retirement
जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोनाल्डो याच्या नेतृत्वात पोर्तुगालने स्पेनला हरवत दुसऱ्यांदा नेशन्स लीग स्पर्धा जिंकली. पेनल्टी शूट आउटपर्यंत गेलेल्या या सामन्यात, सामन्याच्या वेळेत रोनाल्डो याने गोल करत संघाला बरोबरी करून दिली होती. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. सामना संपल्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“सरावा दरम्यानच मी दुखापतग्रस्त असल्याचे मला जाणवले. मात्र, देशासाठी तुटलेल्या पायाने खेळण्यासाठी देखील मी सज्ज होतो. तुम्हाला माहीतच आहे की मी किती वयाचा आहे. स्पष्ट सांगायचे झाले तर आता कारकिर्दीचा शेवट जवळ आला आहे. मात्र, मला गंभीर दुखापत झाली नाही तर, मी शक्य तितका खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेन.”
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सध्या रोनाल्डो 40 वर्षांचा असून, तो पोर्तुगाल व सौदीमध्ये फुटबॉल खेळतो. एकेकाळी रोनाल्डो जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू होता. तसेच, सध्याच्या जगातील सर्वात प्रसिद्ध व श्रीमंत फुटबॉलपटू आहे.
Cristiano Ronaldo Hints Retirement
हे देखील वाचा: स्पेनचा पाडाव करत पोर्तुगालने जिंकली UEFA Nations League 2025