
Rohit Sharma As Captain: दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय संपादन केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारताने उत्कृष्ट सांघिक कामगिरी केली. यासोबतच संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एक ऐतिहासिक कामगिरी केली.
Rohit Sharma Record As Captain
विजयाचा दावेदार मानला जाणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात अपेक्षित कामगिरी करताना सहज विजय संपादन केला. शानदार 84 धावांची खेळी करणारा विराट कोहली सामनावीर ठरला. भारतीय संघाने यासह आयसीसी स्पर्धांमधील आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावे एक खास पराक्रम नोंद झाला.
रोहित हा जागतिक क्रिकेटमधील पहिला कर्णधार बनला, ज्याच्या नेतृत्वात संघ सर्व आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. रोहितने 2021 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यानंतर 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी भारताने खेळली. तसेच 2023 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी देखील भारत पात्र ठरला होता. मात्र, या दोन्ही वेळी भारतीय संघाला अपयश आले.
रोहितच्या नेतृत्वात भारताने 2022 व 2024 असे दोन टी20 विश्वचषक खेळले. त्यापैकी 2022 मध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली होती. तर 2024 मध्ये संघाने विश्वविजेतेपद जिंकले. याव्यतिरिक्त 2023 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत देखील भारत पोचला होता. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील भारताने धडक मारली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
रोहितच्या आधी एमएस धोनी याने कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार होता. धोनी कर्णधार असताना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ही स्पर्धा खेळली जात नव्हती.
(Rohit Sharma As Captain)
अखेर वर्ल्डकपचे दुःख हलके झाले! ऑस्ट्रेलियाला हरवत भारत Champions Trophy 2025 फायनलमध्ये