
Dewald Brevis Took Flying Catch Of Ruturaj Gaikwad: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांचा दरम्यान रांची (Ranchi ODI) येथे पहिला वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यातून भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने दोन वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटपटू डेवाल्ड ब्रेविस याने एक अफलातून झेल टिपत त्याचे पुनरागमन अपेक्षेप्रमाणे होऊ दिले नाही. या झेलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Pat (@starlord_208) November 30, 2025
Dewald Brevis Took Flying Catch Of Ruturaj Gaikwad
तब्बल दोन वर्षांनंतर भारताच्या वनडे संघात ऋतुराज गायकवाड याने पुनरागमन केले. त्याला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याची संधी मिळाली. मात्र, तो ही संधी साधू शकला नाही. तो 14 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा करू शकला. ओटनील बार्टमन याच्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने फटका त्याने मारला. परंतु, तिथे तैनात असलेल्या डेवाल्ड ब्रेविस याने उजव्या बाजूला हवेत झेपावत एका हातात झेल पकडला. त्याच्या या झेलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऋतुराज याने रणजी ट्रॉफी 2025 व इंडिया ए संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात निवडले गेले होते. ऋतुराज सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावर आत्तापर्यंत खेळत आला आहे. आपल्या 85 सामन्यांच्या लिस्ट ए कारकिर्दीत तो प्रथमच चौथ्या क्रमांकावर खेळला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल
kridacafe