Breaking News

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार ‘डबल रोल’

Dinesh Karthik :- इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल, IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी, RCB) संघाने आगामी हंगामापूर्वी संघात मोठा बदल केला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 साठी त्यांचा दिग्गज यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड केली आहे. तसेच तो आरसीबीच्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजावेल. 

दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये खेळाडूच्या रुपात आरसीबीचा भाग होता. मात्र आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतरदिनेश कार्तिकने या लीगमधून निवृत्ती घेतली होती. परंतु पुढील हंगामापासून तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. आरसीबीने सोशल मीडिया पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान  दिनेश कार्तिक 2015 पासून आरसीबीकडून फिनिशरच्या भूमिकेत खेळत आहे. त्याने आरसीबीकडून 60 सामने खेळताना 937 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके आली आहेत. दिनेश कार्तिकच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2008 साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 5 वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझींकडून 257 सामने खेळताना 4842 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 22 अर्धशतकेही केली आहेत. दिनेश कार्तिकने आरसीबीव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्त्व केले आहे.