Breaking News

शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर

divya deshmukh
Photo Courtesy: X

Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Finals: नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. दिव्याने फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तिने उपांत्य सामन्यात चीनच्या माजी अव्वल बुद्धिबळपटूचा पराभव केला.

Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Final

केवळ 19 वर्षांच्या असलेल्या दिव्या हिने उपांत्य फेरीत चीनच्या टॅन झोंगी हिला दुसऱ्या गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी ड्रॉ खेळला होता. या स्पर्धेत 19 पेक्षा कमी वय असताना अंतिम फेरी गाठणारी ती 34 वर्षातील केवळ पहिली बुद्धिबळपटू ठरली.

स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपी ही देखील उतरणार आहे. फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी ती पहिली भारतीय बनलेली. तिच्यापुढे या उपांत्य सामन्यात चीनच्याच प्रथम मानांकित ली टींगजी हिचे आव्हान असेल. दोन्ही खेळाडू मधील पहिला गेम ड्रॉ झाला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ग्रॅंडमास्टर Koneru Humpy ने रचला इतिहास! FIDE चेस वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिले भारतीय महिला