
Duleep Trophy 2024: दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सामने चांगलेच रंगलेले दिसले. पहिल्या दिवशी एकतर्फी राहिलेल्या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी गोलंदाज व फलंदाजांत चांगला संघर्ष झाला. वाचूया दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) च्या दुसऱ्या दिवसाचा वृत्तांत.
Duleep Trophy 2024 Day 2 Updates
Another intriguing day ends!
India A are off to a steady start at 134/2 in response to India B's 321.
KL Rahul (23*) and Riyan Parag (27*) are at the crease with India A trailing by 187 runs.#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/8GDqDxZ1r4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
पहिला सामना भारत अ विरूद्ध भारत ब-
बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत अ विरूद्ध भारत ब (INDA v INDB) सामन्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा फलंदाजांचेच वर्चस्व दिसले. पहिल्या दिवशी शतक काढून नाबाद असलेला भारत ब संघाचा युवा फलंदाज मुशीर खान (Musheer Khan) याने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी केली. पहिल्या दिवशी शतकी भागीदारी केल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी ही भागीदारी 200 पार नेली.
Stumps Day 2: India A – 134/2 in 34.6 overs (K L Rahul 23 off 80, Riyan Parag 27 off 49) #IndAvIndB #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
आपल्या दुलिप ट्रॉफी पदार्पणात त्याने सर्वांची मने जिंकताना 373 चेंडूंमध्ये 16 चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 181 धावा केल्या. त्याला नवदीप सैनीने उत्कृष्ट साथ देत 56 धावा केल्या. दोघांनी आठव्या गड्यासाठी 205 धावांची विक्रमी भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यानंतर संघाचा डाव 321 धावांवर समाप्त झाला. भारत अ साठी आकाशदीप याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
जवळपास दीड दिवस क्षेत्ररक्षण केल्यानंतर फलंदाजीची संधी मिळालेल्या भारत अ संघासाठी कर्णधार शुबमन गिल व मयंक अगरवाल यांनी 57 धावांची भागीदारी केली. सैनी याने त्यानंतर दोघांना बाद केले. गिलने 25 तर मयंक याने 36 धावांचे योगदान दिले. त्यानंतर केएल राहुल (23) व रियान पराग (27) यांनी जबाबदारीने खेळ करत भारत ब संघाला आणखी यश मिळू दिले नाही. त्यांनी 68 धावांची बिनबाद भागीदारी करत, दिवसाखेर भारत अ संघाला 2 बाद 134 अशी मजल मारून दिली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
दुसरा सामना भारत क विरुद्ध भारत ड-
आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथे सुरू असलेल्या भारत क विरुद्ध भारत ड (INDC v INDD) या सामन्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी केवळ 164 धावांवर सर्वबाद झालेल्या भारत ड संघाने पहिला दिवस समाप्त होताना, भारत क संघाला 4 बाद 91 असे रोखले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर, बाबा इंद्रजीत याने अतिशय धीराने फलंदाजी करत 72 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अभिषेक पोरेल याने 34 धावा करत योगदान दिले. तळातील फलंदाजांनी फारसे योगदान न दिल्याने भारत क संघाचा डाव 168 धावांवर समाप्त झाला. हर्षित राणा याने सर्वाधिक चार बळी टिपले.
Stumps on Day 2!
A riveting day's play ends!
Manav Suthar led India C's fightback with a fifer after brisk fifties from Captain Shreyas Iyer and Devdutt Padikkal.
India D move to 206/8, lead by 202 runs.#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/PcAyYzJ9W7 pic.twitter.com/EdF20mAkGt
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारत ड संघाने आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर अथर्व तायडे व यश दुबे अपयशी ठरल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) व देवदत्त पडिक्कल यांनी वेगवान फटकेबाजी केली. श्रेयस याने केवळ 38 चेंडूंवर झंझावाती अर्धशतक केले. तो 54 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पडिक्कल याने 70 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी केली. या दोघांना रिकी भुई याने 44 धावा करून साथ दिली. दिवस संपण्याआधी झटपट तीन बळी गेल्याने त्यांना, दिवस संपताना 8 बाद 208 अशा स्थितीत जावे लागले.
दिवस संपला तेव्हा अक्षर पटेल 11 व हर्षित राणा खाते न खोलता नाबाद होते. भारत क साठी युवा फिरकीपटू मानव सुथार (Manav Suthar) याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. सध्या भारत ड संघाकडे 204 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे.
(Duleep Trophy 2024 Day 2)
हे देखील वाचा