Breaking News

ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही

eng vs ind
Photo Courtesy: X

ENG vs IND Headingley Test: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेची सुरुवात हेडिंग्ले येथे होईल. या सामन्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया. 

ENG vs IND Headingley Test Preview

ऍंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे नामकरण केलेल्या या मालिकेत भारतीय शुबमन गिल याच्या नेतृत्वात उतरेल. तर, इंग्लंडचे नेतृत्व अनुभवी बेन स्टोक्स यांच्या हातात आहे. लीड्सच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देताना दिसू शकतो. पहिल्या सत्रात चेंडू काहीशी हरकत करताना दिसेल. मात्र, त्यानंतर खेळपट्टी  फलंदाजीला पूरक होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात झालेल्या दोन काऊंटी सामन्यात अशीच परिस्थिती दिसून आलेली.

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता नाणेफेक होईल. 3.30 ते 5.30 असा पहिल्या सत्राचा खेळ होणार आहे. त्यानंतर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.10 ते 8.10 असे दुसरे सत्र खेळले जाईल. त्यानंतर वीस मिनिटांचा चहापान होऊन 8.30 ते 10.30 असे अखेरचे सत्र होणार आहे. भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क व जिओ हॉटस्टार हे सामन्यांचे थेट प्रक्षेपण करतील. (Where To Watch ENG vs IND Test Series)

हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडने यापूर्वीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. तर, भारतीय प्लेईंग इलेव्हन नाणेफेकीवेळी घोषित केली जाईल.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक,बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग व शोएब बशीर

भारत संभाव्य प्लेईंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करूण नायर, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, नितिशकुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: For 60 Overs They Should Feel Like Hell Out There… जेव्हा विराटच्या एका वाक्याने लॉर्ड्सवर चवताळली टीम इंडिया, वाचा संपूर्ण स्टोरी