Breaking News

ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 2
Photo Courtesy: X

ENG vs IND Manchester Test Day 2 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने आपले वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला सामन्यात पुढे नेले. बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे पाच बळी व झॅक क्राऊली (Zak Crawley) आणि बेन डकेट (Ben Duckett) यांची डेड शतकी सलामी दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

ENG vs IND Manchester Test Day 2 Highlights

– दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 4 बाद 264 वरून सुरू

– रवींद्र जडेजा दुसऱ्याच षटकात जोफ्रा आर्चरचा शिकार

– शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदर यांनी सावरला डाव

– दोघांनी सहाव्या गड्यासाठी जोडल्या 48 धावा

– पुनरागमन करत असलेल्या शार्दुलची 41 धावांची खेळी

– पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त झालेल्या रिषभ पंतने झुंजार वृत्ती दाखवत लंगडत मैदानात केला प्रवेश

– लंचपर्यंत भारत 6 बाद 321

– लंचनंतर इंग्लंडने स्वीकारले आक्रमक धोरण

– सुंदर व अंशुल कंबोज एकाच षटकात बाद

– इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मिळवले पाच बळी

– रिषभ पंतने पूर्ण केले आपले अर्धशतक मात्र 54 धावांवर आर्चरने उडवला त्रिफळा

– बुमराहला बाद करून आर्चरने मिळवला तिसरा बळी

– भारत पहिल्या डावात सर्वबाद 358

– इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊली व बेन डकेट यांनी सुरू केला बॅझबॉल

– दोघांनी आक्रमक फटके खेळत केली अर्धशतकी भागीदारी

– बेन डकेटचे केवळ 46 चेंडूंमध्ये अर्धशतक

– चहापानापर्यंत इंग्लंड 14 षटकात बिनबाद 77

– अखेरच्या सत्रातही डकेट-क्राऊली जोडीचे आक्रमण सुरूच

– क्राऊलीनेही साजरे केले अर्धशतक

– भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत दिली दीडशतकी सलामी

– अखेर 166 धावांची भागीदारी जडेजाने तोडली, क्राऊलीने केल्या 84 धावा

– भारतासाठी पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजने वैयक्तिक 94 धावांवर डकेटला केले बाद

– त्यानंतर आणखी पडझड न होऊ देता जो रूट व ओली पोप यांची 28 धावांची भागीदारी

– दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड 2 बाद 225

– भारताकडे अद्याप 133 धावांची आघाडी

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:  ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स