Breaking News

वॅटकिन्सच्या लेट गोलने इंग्लंड EURO 2024 Final मध्ये! स्पेनविरूद्ध किताबी लढत

euro 2024
Photo Courtesy: X/Euro 2024

Euro 2024: युरो 2024 फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड (ENG vs NED) समोरासमोर आले. पूर्ण वेळेच्या अगदी अखेरच्या क्षणी निकाल लागलेल्या या सामन्यात इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंड अंतिम सामन्यात स्पेन संघाशी दोन हात करेल.

सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. नेदरलँड्ससाठी सिमन्स याने सातव्याच मिनिटाला गोल करत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर 18 व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी कर्णधार हॅरी केन याने सत्कारणी लावत इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले मात्र यश मिळाले नाही. पूर्ण वेळेची 90 मिनिटे होत असतानाच मिळालेल्या संधीवर ओली वॅटकिन्स (Ollie Watkins) याने शानदार मैदानी गोल करत, इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित केला. त्यानंतर नेदरलँड्सला गोल करता आला नाही व त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

अंतिम फेरीत आता इंग्लंड आणि स्पेन (SPA vs ENG) लढतील. स्पेन बारा वर्षानंतर स्पर्धेची अंतिम फेरी खेळत आहे. तर, मागील वर्ष हुकलेले विजेतेपद मिळवण्याचा इंग्लंड प्रयत्न करेल.

(Euro 2024 England Reaches Final)