Euro 2024| युरो कप 2024 (Euro Cup 2024) स्पर्धेला शनिवारी (15 जून) प्रारंभ झाला. म्युनिक येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनी व स्कॉटलंड (GER vs SCO) आमने-सामने आले. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली.
An opening match to remember for Germany 🇩🇪#EURO2024 | #GERSCO pic.twitter.com/luXAFwUS1E
— UEFA EURO 2024 (@EURO2024) June 14, 2024
सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटात फ्लोरीयन विर्त्झ (Florian Wirtz) याने स्पर्धेतील पहिला गोल नोंदवला (Euro 2024 First Goal Florian Wirtz). ही सुरुवात त्यानंतर अखेरपर्यंत थांबली नाही. जमाल मुसियाला याने 19 व्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट केली. पहिला हाफ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना इंजुरी टाईममध्ये कायले हावर्त्झ (Kyle Havertz) याने आणखी एक गोल नोंदवत जर्मनीला 3-0 अशी आघाडी दिली.
दुसऱ्या हाफमध्ये देखील जर्मनीने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. निकलास फुलक्रुग याने 68 व्या मिनिटाला आपला पहिला युरो गोल झळकावला. त्यानंतर 87 व्या मिनिटाला स्कॉटलंड संघासाठी सामन्यातील आनंदाचा एकमेव क्षण आला. जर्मनीचा अनुभवी डिफेंडर ऍंटिनिओ रुडीगर याने सेल्फ गोल केल्याने, स्कॉटलंडच्या नावापुढे एका गोलची नोंद झाली. इम्रे कॅन याने इंजुरी टाईममध्ये आपला पहिला व संघाचा पाचवा गोल करत सामना संपवला.
आजचा दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात हंगेरी व स्वित्झर्लंड (HUN vs SUI) भिडतील. तर, अन्य एका सामन्यात स्पेन व क्रोएशिया (SPA vs CRO) एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. हा सामना सायंकाळी 9.30 वाजता सुरू होईल.
(Euro 2024 Germany Beat Scotland 5-1 In Opening Match)