
Euro 2024 Pre QF Fixtures: जगातील दुसरी सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो 2024 (Euro 2024) स्पर्धेतील अव्वल 16 संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरीतील सामने समाप्त झाल्यानंतर या उप-उपांत्यपूर्व फेरीचे चित्र अधिक स्पष्ट झाले.
Round of 16 set ✅
🏆 Sim the KO stage and choose who wins EURO 2024 ⬇️#EUROpredictor | #Betano
— UEFA EURO 2024 (@EURO2024) June 26, 2024
उप-उपांत्यपूर्व फेरीत अ गटातील यजमान जर्मनी व स्वित्झर्लंड यांनी जागा पक्की केली. ग्रुप ऑफ डेथ म्हणल्या जाणाऱ्या ब गटातून स्पेन व इटली आगेकूच करण्यात यशस्वी ठरले. क गटातून इंग्लंड व डेन्मार्क यांच्यासह तिसऱ्या स्थानी राहिलेल स्लोव्हेनियाला राऊंड ऑफ 16 चे तिकीट मिळाले.
मजबूत समजल्या जाणाऱ्या ड गटातून ऑस्ट्रीयाने अनपेक्षितपणे अव्वल स्थान पटकावले. त्यांच्या पाठोपाठ फ्रान्स व नेदरलँड्स पुढच्या फेरीत पोहोचले. ई गटातून रोमानिया, बेल्जियम व स्लोवाकिया यांनी पुढील फेरीत जागा पक्की केली. तर फ गटातून पोर्तुगाल, टर्की व जॉर्जिया उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले.
असे रंगणार सामने:
29 जून स्वित्झर्लंड विरुद्ध इटली (सायंकाळी 9.30)
30 जून जर्मनी विरुद्ध डेन्मार्क (मध्यरात्री 12.30)
30 जून इंग्लंड विरुद्ध स्लोवाकिया (सायंकाळी 9.30)
1 जुलै स्पेन विरूद्ध जॉर्जिया (मध्यरात्री 12.30)
1 जुलै फ्रान्स विरूद्ध बेल्जियम (सायंकाळी 9.30)
2 जुलै पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया (मध्यरात्री 12.30)
2 जुलै रोमानिया विरूद्ध नेदरलँड्स (सायंकाळी 9.30)
3 जुलै ऑस्ट्रिया विरूद्ध टर्की (मध्यरात्री 12.30)
(Euro 2024 Pre Quarter Finals Fixtures)
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!