Breaking News

आजपासून रंगणार EURO 2024 चा थरार! फुटबॉलप्रेमींसाठी मेजवानी, एका क्लिकवर स्पर्धेविषयी घ्या जाणून सर्वच

euro 2024
Pgoto Courtesy: X/Sony

Euro 2024|फुटबॉल विश्वचषकानंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या युरो कप 2024 (Euro 2024) स्पर्धेला 15 जून पासून सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून यजमान जर्मनी आणि स्कॉटलंड (GER vs SCO) यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होईल.

जर्मनी यजमानपद भूषवत असलेल्या या स्पर्धेत 24 संघ सहभागी होतील. या संघांना सहा गटात प्रत्येकी चार असे विभाजित केले गेले आहे. प्रत्येक गटात अव्वल राहिलेल्या दोन संघांना थेट उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळेल. तर उर्वरित चार संघ आपापल्या गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले सर्वोत्कृष्ट राहिलेले संघ असतील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी व अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना 15 जुलै रोजी बर्लिन येथे खेळला जाईल.‌ इटली या स्पर्धेत गतविजेता आहे.

अ गट- जर्मनी, स्कॉटलंड, हंगेरी, स्वित्झर्लंड

ब गट- स्पेन, क्रोएशिया, अल्बानिया, इटली

क गट- स्लोवेनिया, डेन्मार्क, सर्बिया, इंग्लंड

ड गट- पोलंड, नेदरलँड्स, फ्रान्स, ऑस्ट्रीया

इ गट- बेल्जियम, स्लोवाकिया, रोमानिया, युक्रेन

फ गट- चेक रिपब्लिक, तुर्की, जॉर्जिया, पोर्तुगाल

युरो कप 2024 वेळापत्रक (Euro Cup 2024 Schedule)

सामन्याच्या वेळा (भारतीय प्रमाणवेळेनुसार)-

मध्यरात्री 12.30, सायंकाळी 6.30, सायंकाळी 9.30

या ठिकाणी पाहा सामने- सोनी स्पोर्ट्स (सोनी टेन 1, सोनी टेन 3)

लाईव्ह स्ट्रीमिंग- सोनी लिव ऍप

(Euro 2024 Starts Today See Euro Cup 2024 Schedule, Groups And Live Streaming)

One comment

  1. You have brought up a very great points, regards for the post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *