
Gautam Gambhir On Foreign Coach: आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) श्रीलंकेला रवाना झाला आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Head Coach Gautam Gambhir) म्हणून जबाबदारी सांभाळेल. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाच्या सहाय्यकांची नावे जाहीर केली. त्यानंतर गंभीरवर आता शब्द बदलल्याचा आरोप होत आहे.
श्रीलंका दौऱ्यापूर्वी गंभीर व आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यासोबतच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर व रेयान टेन डोशचे (Ryan Ten Doeschate) यांची नावे जाहीर केली. तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप आपले पद राखण्यात यशस्वी ठरले. अद्याप गोलंदाजी प्रशिक्षकांचा निर्णय न झाल्याने अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. गंभीर या पदासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याच्या नावासाठी आग्रही आहे. .
आता याच कारणाने गंभीरवर टीका होत आहे. दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना गंभीर म्हणाला होता,
“भारतीय संघासाठी विदेशी प्रशिक्षकांची गरज नाही. त्यांना भावना नसतात व ते भारतात येऊन फक्त पैसे कमावतात. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद हे भारताच्या माजी खेळाडूंकडे द्यायला हवे.”
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मात्र, आता स्वतः गंभीर याने डोशचे याची भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याने अनेकांनी त्याला लक्ष केले. मॉर्केल हा भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनल्यास त्याच्यावर टीका अजून, मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
(Fans Target Gautam Gambhir On Foreign Coach Stand)
अधिकचे वाचा- Team India चे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून हे दोघे कन्फर्म! गंभीर-आगरकरने दिली माहिती
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।