
FIDE Chess World Cup 2025 Final: जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या महिला फिडे चेस विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याला शनिवारी (27 जुलै ) सुरूवात होईल. या अंतिम सामन्यात भारताच्याच दिव्या देशमुख (Divya Deshmukh ) व कोनेरू हंपी (Koneru Humpy ) या आमने-सामने असतील. शनिवारी सामन्यातील पहिला गेम खेळला जाईल. तर, दूसरा गेम रविवारी होईल.
Watch History Unfolding.
India have already won the FIDE Women's World Cup♟️ but who is the Indian?
Schedule & Streaming Finals Day and Week in IST
Game-1(26th July) 4.30 PM
Game-2(27th July) 4.30 PMTIE BREAK(28th July) 4.30PM (If needed)
on Chess base India Youtube Channel. pic.twitter.com/M2dOdDjuKS
— Archisman Mishra (@iamarchis16) July 26, 2025
FIDE Chess World Cup 2025 Final
उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताच्या या दोन्ही बुद्धिबळपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला बुद्धिबळपटू होत्या. त्यानंतर उपांत्य फेरीत दोघींनीही चीनच्या बुद्धिबळपटूंना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता पहिला गेम खेळला जाईल. त्यानंतर रविवारी याचवेळी दुसरा गेम होणार आहे. आवश्यकता भासल्यास सोमवारी (28 जुलै) टायब्रेकर सामना खेळला जाईल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: शाब्बास पोरी! नागपूरच्या Divya Deshmukh ने गाठली चेस वर्ल्डकपची फायनल, इतिहास एका पावलावर