Breaking News

“घरच्यांचा विषय निघतो तेव्हा…”, चाहत्यासह बाचाबाचीच्या व्हायरल व्हीडिओवर Harris Rauf याचे स्पष्टीकरण

Harris Rauf : पाकिस्तानचा वेगवान गोलदाज हरिस राउफचा (Harris Rauf) एका चाहत्याशी बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हरिस राउफ चाहत्याच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे. आता व्हायरल व्हिडीओनंतर हरिस राऊफने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने या घटनेबाबत सविस्तर सांगितलं आहे.

हरिस राउफ म्हणाला, ‘मी हा वाद सोशल मीडियावर न आणण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे यावर माझे मत मांडणं मला महत्त्वाचे वाटते. एक सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही लोकांकडून सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यास तयार आहोत. आम्हाला पाठिंबा देण्याचा किंवा टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण प्रश्न जेव्हा आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा येतो तेव्हा मी प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही. एखादी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांबद्दल आदर दाखवणे महत्वाचे आहे, मग त्यांचं प्रोफेशन कोणतंही असो.’

नेमके काय घडले?

हरिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हरिस रऊफ हॉटेल जवळ पत्नीसोबत फिरत होता. तेव्हा तिथे काही क्रिकेट चाहते होते. यावेळी त्याने हरिस रऊफवर काहीतरी प्रतिक्रिया केली. त्यानंतर हारिस रऊफ अंगावर धावत गेला. त्याला त्याच्या पत्नीने रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तिला बाजूला ढकलून चप्पल काढून चाहत्यांच्या अंगावर धावून जातो. रस्त्याने चालणाऱ्या काही व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ काळजीपूर्वक ऐकला तर एका फोटोवरून हे भांडण झाल्याचे स्पष्ट होते. या व्हिडीओमध्ये हरिससोबतच्या भांडणाच्या वेळी हा चाहता म्हणतो, ‘मी फक्त एक सेल्फी मागितला होता.’ यानंतर हरिस म्हणतो, ‘तू तुझ्या बापाला शिव्या देत आहेस. हा तुमचा भारत नाही.’ असे म्हणताना दिसत आहे.

One comment

  1. Hello! I just would like to give a huge thumbs up for the great info you have here on this post. I will be coming back to your blog for more soon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *