Breaking News

PSG बनली युरोपची बादशाह! पहिल्यांदाच जिंकली UEFA Champions League, इंटर मिलानचा 5-0 ने धुव्वा

uefa champions league
Photo Courtesy: X/PSG

UEFA Champions League 2025: युरोपातील प्रतिष्ठेची युएफा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) स्पर्धा शनिवारी (31 जून) समाप्त झाली. फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) व इटलीच्या इंटर‌ मिलान (Inter Milan) हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा 5-0 असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

PSG Won UEFA Champions League 2025

म्युनिकच्या अलिएंझ एरेना येथे झालेल्या या सामन्यात पीएसजीने सुरुवातीपासून अखेरपर्यंत वर्चस्व गाजवले. हकीमी याने बाराव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आठच मिनिटांनी डोऊने अन्य एक गोल केला. पहिल्या हाफमध्ये अन्य कोणताही गोल झाला नाही. पीएसजीच्या भक्कम बचावापुढे इंटर हतबल दिसली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

दुसऱ्या हाफमध्ये 63 व्या मिनिटाला डोऊने आणखी एक गोल करत संघाला 3-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. क्वारातखेलियाने 73 व्या मिनिटाला व मायूलूने 86 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय निश्चित केला. स्पर्धेच्या इतिहासातील अंतिम सामन्यातील हा सर्वात मोठा विजय आहे.

PSG Won UEFA Champions League 2025

हे देखील वाचा: UEFA Conference League 2025 जिंकून चेल्सी झाली मालामाल, पैशाचा पडला अक्षरशः पाऊस