Breaking News

Highest Tax Payer Indian Cricketers: टॅक्स भरण्यातही विराटच किंग! जबाबदारी पार पाडत भरले तब्बल इतके कोटी

highest tax payer indian cricketers
Photo Courtesy: X

Highest Tax Payer Indian Cricketers: मागील वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची यादी समोर आली आहे. भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वाधिक टॅक्स भरणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने मागील वर्षी तब्बल 66 कोटी इतका टॅक्स भरल्याच्या समजते. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या 20 मध्ये देखील नाही.

फॉर्च्यून इंडिया (Fortune India Report) यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली. विराट कोहली 66 कोटी रुपयांसह या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने 38 कोटी रुपयांचा टॅक्स भरला. सर्वकालीन महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील मागील वर्षी 28 कोटी रुपये कर रूपात भरले. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे 23 कोटी व 13 कोटी रुपयांचा कर भरला.

(Hight Tax Payer Indian Cricketers Virat Paid 66 Crores)

Rahul Dravid यांचे कोच म्हणून कमबॅक? ‘या’ आयपीएल संघासोबत बोलणी पक्की, विक्रम राठोडही देणार साथ