Breaking News

अखेर I League ला सापडला मुहूर्त! ‘या’ दिवशी होणार किक-ऑफ

Photo Courtesy: AIFF

I League 2024-2025: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय लीग (I League) च्या आगामी हंगामासाठी (I League 2024-2025) मुहूर्त मिळाला आहे. जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता 22 नोव्हेंबरपासून नवा हंगाम सुरू होईल.

एआयएफएफ सचिव अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमची सर्व सहभागी क्लबच्या मालकांशी चर्चा झाली असून, ही चर्चा सकारात्मक होती. काही नवे प्रायोजक आणि मोठ्या स्तरावर प्रक्षेपण करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होतील. त्यानंतर 22 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होईल.”

Indian Football मध्ये गदारोळ! अंतर्गत राजकारणाने घेतला प्रमुख स्पर्धांचा बळी, खेळाडूंचे भवितव्य अंधारात

यावर्षी स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. आय लीग 2 स्पर्धेतून प्रमोशन होत एससी बेंगलोर व डेंपो एफसी यावेळी स्पर्धेत खेळतील. तसेच संघटनेचा 21 वर्षाखालील उदयोन्मुख खेळाडूंचा एक संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. पहिल्या दिवशी इंटर काशी विरुद्ध एससी बेंगलोर आणि श्रीनिधी डेक्कन विरुद्ध गोकुलम हे संघ भिडतील.

(I League 2024-2025 Dates Announced)