
ICC Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी जून महिन्यासाठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या (ICC Player Of The Month) नावांची घोषणा केली आहे. पुरुष विभागात भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि महिला विभागात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
A dream run of form in June fetches India's star opener the ICC Women's Player of the Month Award 🏅
— ICC (@ICC) July 9, 2024
जसप्रीत बुमराह याने भारतीय संघासाठी जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळला. त्याने स्पर्धेत 8 सामने खेळताना 15 बळी मिळवले. यादरम्यान त्याचा इकॉनोमी रेट हा पाच पेक्षाही कमी होता. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केले गेले. या पुरस्कारासाठी त्याच्यासोबत भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज यांना नामांकन मिळाले होते. मात्र, बुमराह या दोघांना पछाडण्यात यशस्वी ठरला.
दुसरीकडे, महिला विभागात स्मृती मंधाना या पुरस्काराची मानकरी ठरली. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत तिने जबरदस्त फॉर्म दाखवला. पहिला सामन्यात तिने 117 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 136 धावा तिने फटकावल्या. तर अखेरच्या सामन्यात तिच्या बॅटमधून 90 धावांची खेळी आली होती. तिला या पुरस्कारासाठी इंग्लंडची माईया बोशियर व श्रीलंकेची विश्मी गुणरत्ने यांनी आव्हान दिलेले.
(ICC Player Of The Month June Jasprit Bumrah And Smriti Mandhana)