Breaking News

नुसता धुरळा! Maharaja T20 Trophy मध्ये रंगला ‘ट्रिपल सुपर-ओव्हर’ सामना, वाचा काय-काय घडल, Video पाहा

maharaja t20 trophy
Photo Courtesy: X/Maharaja T20 Trophy

Maharaja T20 Trophy 2024: कर्नाटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या महाराजा टी20 ट्रॉफी (Maharaja T20 Trophy) या स्पर्धेत शुक्रवारी (23 ऑगस्ट) एक ऐतिहासिक सामना खेळला गेला. हुबळी टायगर्स विरूद्ध बेंगळुरू ब्लास्टर्स (Hubli Tigers vs Bengaluru Blasters) अशा झालेल्या या सामन्यात तब्बल तीन सुपर ओव्हर खेळला गेल्या. अखेरीस, हुबळी टायगर्स संघाने या सामन्यात विजय मिळवला.

Triple Super Over In Maharaja T20 Trophy

स्पर्धेचा 17 वा सामना चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळला गेला. मयंक अगरवाल याच्या नेतृत्वातील बेंगळुरू ब्लास्टर्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार मनीष पांडे याने केवळ 22 चेंडूंमध्ये 33 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त मोहम्मद ताहा (31), अनिश्वर गौतम (30) व मानवंथ कुमार (27) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत हुबळी संघाला 164 पर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. ब्लास्टर्ससाठी लविश कौशल याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करताना ब्लास्टर्सचा कर्णधार मयंक अगरवाल याने सर्वाधिक 54 धावा काढल्या. नवीन याने अखेरच्या टप्प्यात आक्रमक 27 धावा करत सामना रोमांचक बनवला. अखेरच्या षटकात एलआर कुमार याने अखेरच्या षटकात सहा धावांचा बचाव करत सामना बरोबरीत सोडवला. हुबळी संघासाठी अष्टपैलू मानवंथ कुमार याने सर्वाधिक चार बळी टिपले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये एलआर कुमार याने केवळ 10 धावा दिल्या. मात्र, हे आव्हान हुबळी टायगर्स पार करू शकला नाही. कर्णधार मनीष पांडे याने षटकार मारत, संघाला 10 धावा पूर्ण करून दिल्या. यानंतर झालेल्या दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ब्लास्टर्सच्या नवीन याने मनीष पांडे व मानवंथ यांना केवळ 8 धावा करू दिल्या. मात्र, हुबळी संघाकडून अनुभवी विद्वत कवीरप्पा याने ब्लास्टर्सच्या फलंदाजांना सामना जिंकू दिला नाही. त्यामुळे प्रथमच ट्रिपल सुपर-ओव्हर (Triple Super Over) खेळण्यात आली.

तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मानवंथ कुमार याच्या गोलंदाजीवर ब्लास्टर्सच्या फलंदाजांनी 12 धावा वसूल केल्या. यानंतर फलंदाजीची संधी मिळालेल्या मानवंथ याने फलंदाजी देखील आपले कौशल्य दाखवताना अखेरच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

(Triple Super Over In Maharaja T20 Trophy 2024 Between Hubli Tigers vs Bengaluru Blasters)

Shivneri Trekkers: स्वातंत्र्यदिनी फडकला लदाखच्या ‘कांगयात्से 2’ शिखरावर तिरंगा! जुन्नरच्या शिवनेरी ट्रेकर्सची अफलातून कामगिरी