Breaking News

IND v BAN: दिल्लीत‌ टीम इंडियाची दबंगई! नितिश-रिंकूच्या तडाख्याने बांगलादेश सैरभैर, बनले नवनवे रेकॉर्ड

ind v ban
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील (IND v BAN T20I) दुसरा सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर 221 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (NitishKumar Reddy) व रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी अर्धशतके झळकावली. यादरम्यान भारतीय फलंदाजांनी नवे विक्रम बनवले.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. मात्र, भारताला पहिले तीन धक्के 41 धावांमध्ये बसलेले. त्यानंतर रेड्डी व रिंकू यांची जोडी जमली. त्यांनी कोणतेही दडपण न घेता बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी तब्बल 108 धावांची भागीदारी केली. आपला दुसराच सामना खेळत असलेल्या रेड्डी याने 34 चेंडूत चार चौकार व सात षटकारांच्या मदतीने 74 धावांची तुफानी खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने रिंकू याने 29 चेंडूत 5 चौकार व तीन षटकार मारत 53 धावा बनवल्या. हे त्याचे टी20 आंतरराष्ट्रीयमधील तिसरे अर्धशतक होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या दोघांव्यतिरिक्त हार्दिक पंड्या याने 19 चेंडूंमध्ये 32 धावा करताना दोन षटकार मारले. याव्यतिरिक्त रियान पराग याने दोन व अर्शदीप याने एक षटकार मारला. भारत विरुद्ध बांगलादेश टी20 सामन्यात भारतीय संघाकडून मारले गेलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी भारताने यावर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध 13 षटकार मारण्याची कामगिरी केलेली.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मधील बांगलादेशविरुद्धची ही कोणत्याही संघाची दुसरी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्याविरुद्ध 2017 मध्ये 224 धावा केल्या होत्या.

(IND v BAN T20I India Hits 15 Sixes In Delhi T20I)