Breaking News

IND v NZ: ये रे माझ्या मागल्या… न्यूझीलंडने 46 धावांत उडवला टीम इंडियाचा खुर्दा, हेन्री-ओ’रोर्क पुढे घातले लोटांगण

ind v nz
Photo Courtesy: x

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या कसोटीतील पहिली कसोटी बेंगळूरु येथे खेळली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्याने, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः माना टाकल्या. मॅट हेन्री व विल ओ’रोर्क यांच्या गोलंदाजी पुढे भारताचा डाव केवळ 46 धावांमध्ये संपुष्टात आला.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय सपशेल चुकला. टीम साऊदी व मॅट हेन्री यांनी पहिल्या अर्ध्या तासात जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. भारताने केवळ 13 धावांवर आपले तीन फलंदाज गमावले होते. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. मात्र, त्यानंतर हे भारताची खराब फलंदाजी सुरूच राहीली.

मॅट हेन्री व विल ओ’रोर्क यांनी अनुक्रमे पाच आणि चार बळी घेत भारताचा डाव 46 धावांवर संपवला. भारताच्या पाच फलंदाजांना खातेही खोलता आले नाही. तर, रिषभ पंत याने सर्वाधिक वीस धावांचे योगदान दिले. भारताची ही मायदेशातील कसोटी क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्या आहे. तर, एकूण भारताची तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरली.

(IND v NZ India All Out On 46 In Bengaluru Test)