Breaking News

IND vs ENG: सेमी फायनलमध्ये दिसणार कोहलीचा ‘किंग’ अवतार? आकडेवारीच देतेय साक्ष

ind vs eng
Photo Courtesy: X

IND vs ENG: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्या दरम्यान खेळला जाईल. गयाना येथे होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात असेल. असे असले तरी, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचे अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यांतील (Virat Kohli In T20 WC Knock Outs) त्याची आकडेवारी नवी आशा दाखवत आहे.

भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या विराटला या विश्वचषकात आपली छाप पाडता आली नाही. दोन वेळा टी20 विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू राहिलेल्या विराटची बॅट यंदा शांत राहिली. साखळी फेरीत तीन सामने खेळताना त्याच्या बॅटमधून फक्त पाच धावा निघाल्या होत्या. तर सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानविरुद्ध 24, बांगलादेशविरुद्ध 37 व ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्य अशाच धावा तो करू शकला. मात्र, उपांत्य फेरीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

विराटच्या आत्तापर्यंतच्या टी20 विश्वचषक नॉक आऊटचे आकडेवारीचा विचार केल्यास तो खूप पुढे असलेला दिसून येतो. त्याने टी20 विश्वचषक नॉक आऊटचे चार सामने खेळले असून, या सर्वांमध्ये अर्धशतक झळकावले आहे. 2014 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद 74 धावांची खेळी केली होती. तर, त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याच्या बॅटमधून 77 धावा आलेल्या.

भारतातच झालेल्या 2016 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद 89 धावा केल्या होत्या. तर मागील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्धच 50 धावांची खेळी करण्यात त्याला यश आलेले. यादरम्यान त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त राहिली आहे. याच कारणाने विराट यावेळी देखील मोठी खेळी करू शकतो असा विश्वास व्यक्त केला जातोय.

(IND vs ENG Virat Kohli Amazing Batting Record In T20 World Cup Knock Outs)

रोहित शर्मा आणि संघाचं T20 World Cup Final गाठणं 100 टक्के निश्चित! ‘बॅड लक’ झालंय दूर

One comment

  1. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.info/en-IN/register?ref=UM6SMJM3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *