Breaking News

जोडी असावी तर मिस्टर अँड मिसेस बुमराहसारखी..! जसप्रीत-संजनाचा ऑनकॅमेरा रो’मान्स- Video

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan :- पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. भारताच्या १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना बुमराहने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही काढल्या. त्यापैकी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याची विकेट सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. रिझवानला ३१ धावांवर त्रिफळाचीत करत बुमराहने सामना भारताच्या बाजूने वळवला. त्याच्या या मॅच विनिंग प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर बुमराह व त्याची पत्नी आणि अँकर संजना गणेशन (Sanjana Ganeshan) यांच्यातील प्रेमळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

त्याचे झाले असे की, प्रत्येक सामन्यानंतर आयसीसीकडून सामन्या

jasprit bumrah-sanjana ganeshan
Photo Courtesy: Instagram/ICC

चा नायक ठरलेल्या खेळाडूंची मुलाखत घेण्यात येत असते. भारत-पाक सामन्यानंतर देखील जसप्रीत बुमराहची मुलाखत त्याचीच पत्नी संजना गणेशनने घेतली. दोघांनी एकदम प्रोफेशनल पद्धतीने मुलाखत दिली. पण शेवटी दोघांचे पती-पत्नी प्रेम समोर आलेच. जाताना बुमराह म्हणाला, “भेटू परत अर्ध्या तासात.” तर संजना म्हणाली “डिनर मध्ये काय बनवू?”

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

पत्नी-पत्नीमधील हा ऑनकॅमेरा प्रेमळ संवाद सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. अनेकांनी आयसीसीच्या या व्हिडिओखाली मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खरंच जोडी असावी तर बुमराह आणि संजना सारखी”, अशी प्रतिक्रिया एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने दिली आहे, तर दुसऱ्याने “पुरुष फक्त त्याच्या आवडत्या महिलेला मुलाखत देण्यासाठी सामनावीर पुरस्कार जिंकतो” अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

INDvsPAK | ‘ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो, पण लाज वाटली…’, पाकिस्तानी चाहत्याचा Video Viral

One comment

  1. awesome

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *