Breaking News

India Tour Of England 2025: इंग्लंड दौऱ्याआधी गिल-गंभीरची पत्रकार परिषद, वाचा काय-काय म्हणाले

india tour of england 2025
Photo Courtesy: X

India Tour Of England 2025 Press Conference: आयपीएलच्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (6 जून) इंग्लंडला रवाना होईल. या दौऱ्याला जाण्यापूर्वी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये दोघांनी दौऱ्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

India Tour Of England 2025 Press Conference

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी गिल आणि गंभीर यांनी दौऱ्याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याविषयी विचारले असता गंभीर म्हणाला, “जसप्रीत दौऱ्यावर तीन सामने खेळेल. मात्र, हे सामने कोणते असतील याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मालिकेतील स्थितीवर हा निर्णय घेतला जाईल.”

भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील पराभवांविषयी विचारले असता तो म्हणाला, “अशाप्रकारे मनाविरुद्ध निकाल लागल्यावर वाईट वाटते. वैयक्तिक माझ्यावर देखील दबाव असतो. देशासाठी चांगलाच निकाल देण्याचा सर्वांचा प्रयत्न राहतो.”

तब्बल 8 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या करुण नायर याच्याविषयी विचारले असता गंभीरने सांगितले, “नायरचा अनुभव आणि फॉर्म जबरदस्त आहे. इंग्लंडच्या वातावरणात याचा नक्कीच संघाला फायदा होईल.”

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याला संघात स्थान मिळाले नाही. त्याबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला, “फॉर्ममध्ये असलेल्या प्रत्येकाला संधी देता येत नाही. आपल्याला 18 च खेळाडू निवडायचे असतात. या प्रश्नाचे उत्तर निवडसमिती अध्यक्ष योग्यरित्या देतील.”

कर्णधार गिल याने माजी कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे संघात पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले. तसेच ही इतरांसाठी संधी असेल असे देखील त्याने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ– शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार) यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, अभिमन्यू ईस्वरन, ध्रुव जुरेल, करूण नायर, रविंद्र जडेजा, नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

India Tour Of England 2025 Press Conference

India Tour Of England 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कसोटी संघात अनेक नवे चेहरे, पाहा संपूर्ण संघ