
Oval Test Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्ती झाली. भारताने दिलेले विजयासाठीचे 373 धावांचे मोठे आव्हान इंग्लंड करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या दिवशी 4 फलंदाज 35 धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारताने सामना सहा धावांनी खिशात घातला. यासह मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
A thrilling end to a captivating series 🙌#TeamIndia win the 5th and Final Test by 6 runs
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE
#ENGvIND pic.twitter.com/9ybTxGd61A
— BCCI (@BCCI) August 4, 2025
India Won Oval Test Against England
अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी चार बदल केले होते. भारताने आपल्या पहिल्या डावात केवळ 224 धावा केल्या. इंग्लंडसाठी गस ऍटकिन्सन याने पाच बळी मिळवले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंड केवळ 247 धावा करू शकली. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे शतक व वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि आकाश दीप यांच्या अर्धशतकांमुळे 396 अशी मजल मारली.
त्यानंतर इंग्लंडने विजयासाठी मिळालेले 373 धावांचे आव्हान पार करताना जो रूट व हॅरी ब्रूक यांनी शतके ठोकली. इंग्लंडची अवस्था एक वेळ 3 बाद 301 अशी असताना भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा चौथ्या दिवशी इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. यासाठी त्यांचे चार फलंदाज शिल्लक होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशी सकाळी अवघ्या 28 धावांत उर्वरित चार बळी मिळवत सामना जिंकवला. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हेडिंग्ले येथील मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवून आघाडी घेतलेली. त्यानंतर भारतीय संघाने एजबॅस्टन कसोटी आपल्या नावे करत बरोबरी साधली. लॉर्ड्स येथील तिसऱ्या अटीतटीच्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत आघाडी घेतलेली. तर, मँचेस्टर येथील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिलेला. हॅरी ब्रूक व शुबमन गिल यांना मालिकेचे मानकरी म्हणून निवडले गेले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: एबीने दक्षिण आफ्रिकेला नेली WCL 2025 ची ट्रॉफी! फायनलमध्ये ठोकले वादळी शतक
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।