Breaking News

भारत सेटींग लावून T20 World Cup Final मध्ये पोहोचला; टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

Team India Enters T20 World Cup Final : टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता 29 जून रोजी अंतिम सामन्यात त्यांची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल. मात्र भारतीय संघाचे हे यश शेजारील पाकिस्तानला पचलेले दिसत नाही.

एकीकडे भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश करत असतानाच दुसरीकडे भारतीय संघ सेटींग लावून अंतिम सामन्यात पोहचल्याचा सूर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने (Inzmam-Ul-Haq) लावला आहे. भारतीय संघावर तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंझमामने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. 2024 च्या टी20 विश्वचषकाच्या वेळापत्रकावरुन इंझमामने टीका केली आहे. भारतीय संघ चेंडू छेडछाड करतो असे बिनबुडाचे आरोप केल्यानंतर आता इंझमामने विश्वचषकाच्या वेळापत्रकावरुन टीका करताना भारतीय संघ कुठे उपांत्य सामना खेळणार हे स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच ठरवलं होतं असा दावा इंझमामने केला आहे.

इंझमामने हा अन्याय असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानला असा फायदा कधीच झाला नसल्याचंही तो म्हणाला. इंझमामने भारतीय संघावर टीका करताना, भारताच्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस नसणं हे भारताच्या दृष्टीने फायद्याचं आणि सोयीस्कर ठरेल असेच नियोजन करण्यात आल्याचाही आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *