IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी सर्व संघ आपल्या रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. यासाठी 31 ऑक्टोबर ही अखेरची तारीख असेल. तत्पूर्वी, तीन संघाने आपले रिटेन होणारे खेळाडू निश्चित केल्याची बातमी समोर येत आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स, उपविजेते सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांनी आपले खेळाडू अंतिम केल्याच्या सांगण्यात येतेय. मात्र, अधिकृतरित्या त्याची संघांकडून घोषणा झालेली नाही.
तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल विजेतेपद पटकावले होते. आयपीएल 2025 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR IPL 2025 Retention) पाच खेळाडूंना रिटेन करू शकते. कर्णधार श्रेयस अय्यर व सुनील नरीन यांना प्रत्येकी 18 कोटी रुपये देत रिटर्न केले जाईल. तर, रिंकू सिंग याला 14 कोटी व आंद्रे रसेल याला 11 कोटी देण्याची शक्यता आहे. भारतीय संघाची जर्सी घालण्यापासून थोडक्यात राहिलेला युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा 4 कोटी घेऊन रिटेन होऊ शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पराभव झालेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH IPL 2025 Retention) संघाचे तीन खेळाडू अंतिम झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन याला तब्बल 23 कोटी रुपये देत रिटेन केले जाईल. तर कर्णधार पॅट कमिन्स याला 18 कोटी व युवा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याला 14 कोटी रुपयांत रिटेन केल्या जाऊ शकते. ट्रेविस हेड व अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी यांच्याशी चर्चा सुरू असून, ते रिटेन न झाल्यास लिलावात आरटीएम कार्डचा वापर करून त्यांना पुन्हा संघाचा भाग बनवण्यात येण्याची शक्यता आहे.
आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने केवळ तीन खेळाडू रिटेन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. कर्णधार रिषभ पंत 18 कोटी, अष्टपैलू अक्षर पटेल 14 कोटी व फिरकीपटू कुलदीप यादव 11 कोटी या किंमतीवर रिटेन होऊ शकतात. तसेच, दिल्ली लिलावात जॅक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स व अभिषेक पोरेल यांच्यासाठी आरटीएम वापरू शकते.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे सूर्यकुमार यादव व जसप्रीत बुमराह यांचेच रिटेन्शन नक्की मानले जात आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पंड्या यांच्या बाबतीत अद्याप फ्रॅंचायजी कोणताही निर्णय घेऊ शकली नाही. तर, चेन्नई सुपर किंग्सकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी व मथिशा पथिराना यांना रिटेन करणे निश्चित आहे. इतर तीन नावांमध्ये रचिन रविंद्र, शिवम दुबे आणि डेवॉन कॉनवे यांचा समावेश असू शकतो.
(IPL 2025 Retention DC SRH KKR Retention)
IPL 2025 Retention चे सर्व नियम आपल्या सोप्या मराठी भाषेत, उदाहरणांसह